कोथिंबीर हे कमी वेळात येणारे चांगल्या आर्थिक नफा देऊन जाणारे उत्तम पीक आहे. साधारणतः कोथिंबिरीला वर्षभर बाजारात चांगल्या प्रकारचे मागणी असते. व्यवस्थित तंत्रज्ञानाचा वापर करून आणि व्यवस्थित नियोजन केले तर कोथिंबीरीचे पीक हमखास भरघोस नफा मिळवून जाते. या लेखांमधून आपण कोथिंबीर लागवड विषयी माहिती घेऊ.
कोथिंबीरीची लागवड ही भारतात सर्वच राज्यात केली जाते कोथिंबीर ला वर्षभर मागणी असते कोथिंबीर हे रोजच्या जीवनात वापरणारी एक महत्वपूर्ण वस्तू आहे तर या लागवडीसाठी जमीन कशी लागते तर या पिकासाठी मध्यम ते कसदार आणि मध्यम खोलीची जमीन लागते तसेच जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यास हलक्‍या किंवा भारी जमिनीत सुद्धा याची लागवड आपण करू शकतो.

जमीन:

कोथिंबीरीच्या लागवडीसाठी मध्यम कसदार आणि मध्यम खोलीची जमीन योग्य असते. परंतु जमिनीत सेंद्रिय खते जास्त प्रमाणात असतील तर हलक्या किंवा भारी कसदार असलेल्या जमिनीत देखील कोथिंबीर लागवड करू शकतो.


हवामान:

तसे पाहता कोथिंबीरीची लागवड ही कोणत्याही हवामानात करू शकतो परंतु अति पाऊस किंवा अति ऊन असेल तर कोथिंबीरीची वाढ हवी तशी होत नाही.

आधी सांगितल्या प्रमाणे उन्हाळ्यात कोथिंबीरीची वाढ कमी असते पण मागणी जास्त असल्याने बाजारात भाव चांगला असतो त्यामुळे पाण्याची उपलब्दता असेल तर उन्हाळ्यात देखील कोथिंबीर लागवड करून जास्त नफा मिळवता येतो.

लागवड पध्दुत:

कोथिंबीरीची लागवड करण्याआधी जमीन नांगरून व कुळवून चांगली भुसभुशीत करून घ्यावी. जमिनीत एकरी 6 ते 8 टन चांगले कुजलेले शेणखत घालावे.

त्यानंतर 3×2 मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावे. आपण ह्या वाफ्यात बी फेकून लागवड करू शकतो. बी फेकून लागवड करताना बी सारखे पडेल ह्याची काळजी घ्यावी. बी फेकून लागवड करायची नसेल तर वाफयामध्ये  15 से.मी. अंतरावर खुरप्याने ओळी पाडून त्यात बी पेरु शकतो.

उन्हाळ्यात कोथिंबीर लागवड करायची असेल तर पेरणी आधीच वाफे भिजवा आणि मग वाफसा आल्यानंतर त्यात बी फेकून किंवा ओळी पाडून त्यात बी टाकून पेरणी करावी.

कोथिंबीर लागवडीसाठी एकरी 25 ते 35 किलो बियाणे लागते.

लागवडी आधी धने हळुवार रगडुन फोडून घ्यावेत व त्यातील बी वेगळे करावे तसेच पेरणीपुर्वी धण्याचे बी भिजऊन मग गोणपाटात गुंडाळून ठेवावे. त्यातमुळे उगवण 8 ते 10 दिवसात होते व कोथिंबीरीच्याे उत्पा दनात वाढ होते. त्याचसोबत काढणी देखील लवकर होते.

सुधारित जाती:

व्ही 1, व्ही 2, को-1, डी-92, डी-94, जे 214, के 45, कोइमतूर-1, कोइमतूर-2, लाम सी.एस.- 2, लाम सी.एस.- 4, स्थानिक वाण, जळगाव धना, वाई धना या कोथिंबीरीच्या, स्थासनिक आणि सुधारित जाती लागवडीसाठी वापरली जातात. वैशाली, व्ही 1, व्ही 2, को-1, डी-12, डी-14 याप्रकारचे जाती महाराष्ट्रात जास्त वापरतात या पिकाचा लागवडीचा हंगाम पहिला तर राज्यात पहिला तर कोथिंबीरची खरीप ,रब्बी ,उन्हाळी महाराष्ट्रात या तिन्ही प्रकारच्या हंगामत लागवड केली जाते उन्हाळ्यात लागवड करायची असल्यास येथील आणि मे महिन्यात याची लागवड करावी या पिकाची लागवड पद्धती कशी कशी आहे तर जमिनीची पूर्ण तयारी करताना शेत चांगले नांगरून घ्या त्यानंतर 3 बाय 2 मीटर आकाराचे सपाट वाफे आखून घ्यायची त्या वाफेत चांगले कुजलेले शेणखत टाकून मातीत मिक्स करून घ्यावे वाफे सपाट करुन बी सारखे पडेल या हिशोबाने फेकून बी हे खत मातीने झाकून थोडीशी पाणी द्यावे बाकीचे पिकांना देतो पण लागते तितका पाणी कोथिंबीर लागत नाही कोथिंबीर ला थोड्या प्रमाणात पाणी द्यावे

कोथिंबिरीसाठी खत व पाणी व्यवस्थापन:
कोथिंबीर लागवड ज्या जमिनीत करायची आहे त्या जमिनीत लागवड आधी 5 ते 6 टन चांगले कुजलेले शेणखत टाकून घ्यावे. कोथिंबीर उगवल्यानंतर साधारणतः 35  ते 40 दिवसांनी 40 किलो नत्राची मात्रा द्यावी. तिच्यासोबत 25 दिवसांनी 100 लिटर पाण्यात 800 ग्रॅम युरिया मिसळून दोन फवारण्या करून घ्याव्यात. त्यामुळे कोथिंबिरीची वाढ उत्तम होते.  कोथिंबीर एक कोवळी पीक असल्यामुळे त्याला नियमित पाण्याची गरज असते त्यामुळे उन्हाळ्यात दर 4 ते 5 दिवसांनी हिवाळ्यात 7 ते 9 दिवसांनी पाणी द्यावे.

कोथिंबीरवरील कीड व रोग:
कोथिंबीर पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. कधी कधी मर, भुरी या रोगांचा प्रार्दूभाव दिसतो. अशावेळी शिफारसीनुसार भुर रोगासाठी भुरी प्रतिबंधक वापरू शकतो तसेच पाण्यानत विरघळणारे गंधक वापरावे.

काढणी व उत्पादन:
पेरणी नंतर 40 ते 45 दिवसानी कोथिंबीर 15 ते 20 से.मी. उंचीची होते त्यावेळी ती उपटून किंवा कापून काढणी करावी. पेरणीच्या 2 महिन्यांनंतर कोथिंबीरीला फुले यायला सुरवात होते त्यामुळे त्या आधीच काढणी करणे महत्वाचे आहे. पावसाळी आणि हिवाळी हंगामात हिरव्या कोथिंबीरीचे एकरी 4 ते 6 टन उत्पादन मिळते तर उन्हााळी हंगामात हेच उत्पादन 2.5 ते 3.5 टन मिळते. 

अधिक माहितीसाठी कृपया अग्रोभूमि वर साइन अप करा ! आपण संपर्क पृष्ठाच्या(संपर्क साधा) माध्‍यमातून आम्हाला संदेश पाठवू शकता.