अवेळी पाऊस आणि पावसाचे नैसर्गिक चक्र वर्षानुवर्षे बदलत चालले असल्याने पिकांचा खरीप आणि रब्बी हंगामाचा कालावधी बदलण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे सहकार खात्याच्या निदर्शनास आले. रब्बी हंगामात आंतरपीक पद्धती अवलंबल्यास हेक्टरी उत्पादन जास्त‍ मिळून नफा होतो. आंतरपीक पद्धतीमध्ये रब्बी ज्वारी + हरभरा (६:३) आणि रब्बी ज्वारी + करडई (६:३) या पीक पद्धती जास्त आर्थिक फायदा देतात.

व्यवस्थापनाचे सुधारित तंत्रज्ञान विकसित करूनही तणांचा प्रादुर्भाव अपेक्षेप्रमाणे नियंत्रित करता आलेला नाही, याची बरीच करणे आहेत. यात प्रामुख्याने रासायनिक खत व पाणी यांचा अतिरेक वापर, अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचा वापर, अधिक प्रमाणात जमिनीची मशागत, एकपीक पध्दतीत द्विदल पिकांच्या अंतर्भावाचा अभाव, जागतिकीकरण व हवामान बदल तसेच परदेशी तणांचा प्रादुर्भाव, तणनाशकास प्रतिकारक्षम अशी तयार होणारी तणे या बाबी भविष्यात तण व्यवस्थापनातील प्रमुख अडथळे ठरणार आहेत. या सर्व बाबींचा विचार करता तणांत विविधांगी गुणधर्मामुळे कार्यक्षम तण व्यवस्थापनाकरिता तणांचे सातत्याने परीक्षण आणि तंत्रज्ञानात वेळोवेळी बदल करणे आवश्यक आहे.

तणांमुळे पिकाच्या उत्पादनात येणारी घट ही पिके व पिकांच्या सभोवतील कृषि परिस्थितीच्या घटकांवर अवलंबून असते. तणांमुळे पिक उत्पादनात सरासरी ३३ टक्के घट येते, या तुलनेत कीटकांमुळे २६ टक्के, रोगामुळे २० टक्के व इतर घटकांमुळे २१ टक्के घट येते. याचा अर्थ इतर कोणत्याही घटकांमुळे येणाऱ्या घटीपेक्षा पिक उत्पादनामध्ये तणांमुळे येणारी घट ही अधिक असते. आपल्या देशाचे भरडधान्य, कडधान्य व तेलबिया पिकामध्ये प्रतिवर्षी रु.५० हजार कोटीचे नुकसान निविष्ठा कार्यक्षमता, पिकावर वाढणारे किड व रोगांचा प्रादुर्भाव याचा विचार करता तणांमुळे होणाऱ्या वार्षिक नुकसानीची आकडेवारी ही अधिक होऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करता प्रभावी तण व्यवस्थापनासही पिक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. तणे पिकांच्या बरोबरीने अन्नद्रव्ये, ओलावा, सूर्यप्रकाश, हवा, जागा यासाठी स्पर्धा करतात. त्यामुळे पीक उत्पादनात घट येते. तणांवर कीड व रोगांना आश्रय मिळतो. पीक व्यवस्थापन करताना तण नियंत्रणावर जास्त खर्च करावा लागतो. तणांमुळे मानव तसेच जनावरांना ऍलर्जी निर्माण होऊ शकते. 

तणांमुळे होणारे नुकसान :
रोग आणि किडी यांमुळे पिकांचे पुष्कळ नुकसान होते. पंरतु त्याहीपेक्षा जास्त नुकसान तणांमुळे होते, असा अंदाज आहे. तणांची मुळीच दखल न घेतल्यास (म्हणजे तणांवर काहीही उपाययोजना न केल्यास) ७० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होते.

तण नियंत्रणाच्या पद्धती

प्रतिबंधात्मक उपाय:
तणांचा शेतामध्ये प्रादुर्भाव व तणांची वाढ होऊ उदा. प्रमाणित बियाणांचा वापर करणे, तण विरहित बियाणे पेरणीकरिता वापरणे, पेरणीपूर्वी तणे नष्ट करणे. पूर्ण कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत वापरणे, जमिनीची पूर्वमशागत योग्य रीतीने करणे, शेताचे बांध पाण्याच्या चारी/पाट व शेतातील रस्ते तण विरहित ठेवणे इत्यादी.

निवारणात्मक उपाय: 
तणांचा प्रादुर्भाव शेतामध्ये झाल्यानंतर तणांची तीव्रता कमी करण्यासाठी वापरावयाच्या सर्व पद्धती या प्रकारात मोडतात. यामध्ये प्रामुख्याने भौतिक, मशागत व यांत्रिक पद्धतीचा समावेश होतो. उदा. हाताने तण उपटणे, कोळपणी, खुरपणी, खांदणी, मशागत, तणांची कापणी व छाटणी करणे, तण प्रभावी क्षेत्रात पाणी साठवणे, जाळणे अथवा आच्छादनाचा वापर करणे.

मशागत पद्धती:  
स्पर्धात्मक जलद वाढणारी पिके घेणे, योग्य पीक पद्धतीचा व योग्य पेरणी पद्धतीचा अवलंब करणे, प्रती हेक्टरी पिकाची अवलंब करणे, पिकास खते व पाणी देण्याच्या सुधारित पद्धतीचा अवलंब करणे या व्यतिरिक्त जैविक व रासायनिक पद्धतीने तणांचा व्यवस्थापन केले जाते. तण व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा वापर करून त्यांचे दिसून येणारे अपेक्षित परिणाम व विशिष्ट प्रकारच्या तण व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावयाची शक्यता ही प्रामुख्याने तणांचा प्रकार व त्याने व्यापलेले क्षेत्र, त्या भागातील हवामान परिस्थिती, त्या विभागाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती, तण व्यवस्थापनाच्या विविध पद्धती, आर्थिक बाजू व वापरावयाच्या पद्धतीची कार्यक्षमता या घटकांवर अवलंबून असते.

वरील प्रतिबंधात्मक व निवारणात्मक तण व्यवस्थापन पद्धतीचा विचार दर यामुळे पारंपरिक यांत्रिक पद्धतीने तण व्यवस्थापन करणे शेतकऱ्यांना अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत रासायनिक पद्धतीने तण व्यवस्थापन हा पर्याय शेतकऱ्यांनी अंगीकारला असून, आजमितीस कृषी क्षेत्रात तण व्यवस्थापनाकरिता तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. उपलब्ध आकडेवारीनुसार आपल्या देशामध्ये सन १९७०-७१ मध्ये तणनाशकांचा वापर केवळ १६ मेट्रिक टन होता. तो आजमितीस वाढून सन २०११-१२ मध्ये २० हजार मेट्रिक टनावर पोहचला आहे.

रासायनिक पद्धतीने योग्य तण व्यवस्थापन करताना काही महत्वाच्या तांत्रिक बाबींचे ज्ञान असणे अत्यंत महत्वाचे आहे.

  • लेबल क्लेमनुसार तणनाशकाची निवड व वापर करणे.
  • तणनाशकाचा शिफारशीत मात्रा इतकाच वापर करणे. त्यापेक्षा कमी अथवा अधिक वापर टाळणे.
  • योग्य वेळी तणनाशकांची फवारणी उदा. तणनाशकाच्या प्रकारानुसार पीक पेरणीपूर्वी तणनाशक जमिनीत मिसळणे.
  • पिक पेरणीनंतर परंतु पिक व तण उगवण्यापूर्वी जमिनीवर तणनाशक फवारणे व पिक व तणे उगवल्यानंतर तणनाशकाची पिकावर व तणावर फवारणी करणे.
  • तणनाशक फवारणी पद्धतीनुसार नोझलचा वापर करणे.

परंतु या तांत्रिक बाबी संदर्भातील ज्ञानाचा अभाव असल्यास त्याचा विपरीत परिणाम तण व्यवस्थापनावर होऊन फवारणी केलेल्या पिकावरही होऊ शकतो, किंबहुना पूर्ण पिक धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच अधिक काळ जमिनीत अंश राहणाऱ्या तणनाशकामुळे इतर संवेदनशील पिक घेण्यास मर्यादा येतात. त्यामुळे रासायनिक पद्धतीचा अवलंब करताना वरील बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आवश्यकता भासल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. रब्बी हंगामातील पिकातील प्रभावी तण व्यवस्थापन कसे करावे, तण व्यवस्थापनासंबंधी कृषी विद्यापीठाने कोणते तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांसाठी शिफारशीत केलेले आहेत, याचा उल्लेख या लेखात करण्यात आलेला आहे.

अधिक जानकारी पाने के लिए कृपया अग्रोभूमि पर साइनअप करें ! आप संपर्क पृष्ठ के माध्यम से भी हमें संदेश भेज सकते हैं।